Kolhapur: गोबरगॅसमध्ये पडून बालकाचा मृत्यू, खडकेवाडातील दुर्दैवी घटना

0
256

खडकेवाडा ता. कागल येथील पृथ्वीराज प्रशांत कोराणे (वय ३) या बालकाचा खेळत खेळत जाऊन घरामागे असणाऱ्या गोबरगॅसच्या उकिरड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलत्या मुलाच्या अकाली मृत्यूबाबत ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे.

अधिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी १२ वाजता पृथ्वीराज हा घरामागे असणाऱ्या पडसर जागेत खेळत होता. नजरचुकीने तो खेळत खेळत जवळच असणाऱ्या गोबरगॅसमधून बाहेर पडणाऱ्या शेणखतासाठी असणाऱ्या खड्ड्यात पडला. तो दिसेनासा झाल्यामुळे घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली. यावेळी या खड्ड्यातून बुडबुडे येत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी काही युवकांनी काठीच्या साहाय्याने शोधाशोध केली. यावेळी हा बालक आढळून आला. त्याला उपचारासाठी निपाणी आणि तेथून कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला अखेर मृत्यूने गाठलेच. त्याच्या पश्चात पंजोबा, आजोबा, आजी, आई, वडील असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here