प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : शिवसेनेच्या युवा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदी ऋतुराज राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी ही निवड जाहीर केली.
सध्या ऋतुराज क्षीरसागर हे कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या युवासेना अध्यक्षपदी कार्यरत असून, गेल्या काही महिन्यांत या दोन्ही लोकसभा मतदारसंघात त्यांनी युवा सैनिकांची मोट बांधली आहे. ऋतुराज हे गेली बारा वर्षे युवासेना, नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून ते युवकांचे नेतृत्व करत आहेत.
विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, डोनेशन विरोधी मोर्चा, रोजगारांचे प्रश्न यांसह शाळा महाविद्यालयातील आरोग्य शिबिरे, मैत्री युवा महोत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत.