उपोषण’ या बाल चित्रपटाचा शेडगेवाडीत शुभारंभ ( चित्रपटातून  बाल मजुरी आणि गुन्हेगारी याच्यावर टाकला जातोय प्रकाशझोत) 

0
653

SP9 / कोकरूड प्रतिनिधी

आज समाजात बाल मजुरीमुळे अनेक मुले शिक्षणापासून वचिंत राहीली आहेत. बाल मजुरी व   बाल गुन्हेगारी याच्यावर प्रकाशझोत टाकणारा रुद्र डान्स ॲकॅडमी निर्मित ‘उपोषण’ या बाल लघुचित्रपटाचा शुभारंभ शेडगेवाडी ता. शिराळा येथे करण्यात आला आहे.

यावेळी सोनियाजी उद्योग समूहाचे संस्थापक बाजीराव शेडगे, सरपंच  राहुल पाटील, तानाजी नाटुलकर, दिनकर शेडगे, विकास शेडगे, बाबुराव पाटील , तानाजी मोहीते ,  कोरिओग्राफर अब्दुल शेख  आदी मान्यवर उपस्थित होते.

   या  बालचित्रपटा   जेष्ट अभिनेते अरुण नलावडे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक  व भिनेते दिपक कदम, प्रसिद्ध  अभिनेत्री योगिता भोसले,अभिनेत्री मधुरा गुजर,अभिनेत्री नमिता सिंग अभिनेते ॲड विनोद दोंदे यांच्यासह   बालकलाकार म्हणून आराध्या शिंदे,  श्रुतिका पाटील , रुद्र ढेकळे,   दिक्षा साठे, स्वरा ढेकळे , प्रणाली धनी, जोशना गुरव, जयराज ढेकळे, चंदना झाडे, तेजस्विनी शेळके, जान्हवी पाटील, श्रद्धा सावंत, आरोही पवार हे काम करत आहेत.

  या लघु चित्रपटाचे निर्माते दिलीप ढेकळे,  कार्यकारी निर्माते दिनेश सावंत ,लेखक राकेश शिर्के,  दिग्दर्शन संजय कसबेकर ,  कॅमेरामन म्हणून धनराज वाघ हे  जबाबदारी सांभाळत आहेत.  चौकट: बाल चित्रपटात स्थानिक कलाकार मुलांना संधी  शेडगेवाडी येथे पहील्यांदाच होत असलेल्या उपोषण या बाल चित्रपटात परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील, दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी, सरस्वती विद्या मंदिर शेडगेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here