प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: केएमटी बस कर्मचाऱ्यांकडून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे आदी मागण्यांसह सर्व कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
यामुळे बस वाहतूक खंडीत झाली आहे. प्रशासनाकडून चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शहरा सह परिसरातील प्रवाशांचे हाल झाले आहे मात्र, मागण्या मान्य करा मगच संप मागे घेऊ, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी केएमटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी काल १( डिसेंबर) रात्री प्रशासकांबरोबर झालेली बैठक देखील निष्फळ ठरली. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.