मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात साखळी धरणे

0
104

कोल्हापूर : दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सुरु केलेल्या साखळी धरणे आंदोलनात शनिवारी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार जयंत आसगावकर यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला.

याशिवाय विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही शनिवारी भेट दिली.

दसरा चौकातील मांडवात सकाळी ११ ते १२ या वेळेत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलेे. या आंदोलनादरम्यान समन्वयक वसंत मुळीक, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, सुनीता पाटील आदींनी तासभर धरणे धरले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आमदार प्रकाश आवाडे, इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, ताराराणी आघाडीचे प्रकाश दत्तवाडे यांनी आंदोलकांची भेट घेतली.

वसंतराव मुळीक म्हणाले, जालना येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या शुक्रवारच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. यातून सरकारने धडा घ्यावा.

दरम्यान, प्रकाश आवाडे यांनी सांगितले, की मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एक लेखी पत्र मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यापूर्वीच दिले आहे.

विधानसभेत यावर मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. वसंतराव मुळीक आणि बाबा इंदूलकर यांनी त्यांचे स्वागत केले.

विविध संस्था, पदाधिकाऱ्यांनी दिली भेट

शनिवारी दसरा चौकातील साखळी धरणे आंदोलनाला विविध संस्था आणि पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यामध्ये शेतकरी संघाचे अजित मोहिते, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांचा समावेश आहे.धरणे आंदोलनात शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील, संभाजीराव जगदाळे, उदय लाड, सुनील मोरे, गोपाळ पाटील, फिरोज खान, सुधा सरनाईक, रेश्मा पवार, महादेव जाधव, उत्तम वरुटे, चंद्रकांत चव्हाण, संपतराव पाटील, प्रताप नाईक, अवधूत पाटील सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here