अलिबाग – शेतीची कामे जोरात सुरू असताना संर्पदशांचेही प्रमाण वाढले आहे. सर्पदंशावर उपचारासाठी सरकारी दवाखान्यात औषधांसह सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात 393 सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत.
यातील 4 जणांना उपचार सुरु असताना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्पाने दंश केलेल्या रुग्णांना योग्य उपचार देऊन त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे.
साप चावल्यानंतर पहिल्या दोन तासात प्रथोमचाराबारेाबरच तत्काळ वैद्यकिय उपचार होणे आवश्यक असते, अन्यथा कोर्बा, पुरसा यासारख्या सर्पाने दंश केल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते.
सरकारी दवाखान्यात वेळेत रुग्ण आणूनही कधी डॉक्टर नाहीत, तर कधी व्हेंटीलेटर ऑपरेटर, तर कधी पुरेशी औषधे नाहीत या कारणास्त रायगडमधील नागरिकांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.
सरकारी रुग्णालयात जे उपचार कमी खर्चात होणे शक्य असते. विंचुदंशावर लस शोधून काढणारे महाड येथील डॉ. हिम्मतराव बाविस्कर यांच्या मते सर्पदंशावर वेळेत उपचार न मिळाल्यास शेतकर्यांचे पूर्णपणे अर्थकारण बिघडून जाते.
वेळेत उपचार न झाल्यास किडण्या फेल होणे यासारखे आजार होतातच त्याशिवाय प्रतिकार शक्ती कमी झाल्याने नेहमी आजारी पडणे, त्याचा परिणाम कामावर होणे, यामुळे उत्पन्नावर परिणाम होणे यासारखे बुलढाणा, यवतमाल, अमरावती जिल्ह्यांमध्ये दिसून येतात. नियोस्टीग्मीन, अट्रोपीन, ऑक्शीजन, अॅम्युबॅग अशी अनेक औषघे सर्पदंशावर शोधण्यात आली आहेत.
व्हेटीलेटर हे उपकरण यासाठी उपयुक्त असते. मात्र, अनेक उपजिल्हा रुग्णालयात ते हाताळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने उपचार वेळेत होत नाहीत. यासाठी डॉक्टरांनीही तत्परता बाळगणे आवश्यक आहे, असे म्हणणे डॉ. बाविस्कर यांचे आहे.
सध्या शेतीची कामे सुरू असताना जमीन तापलेली असते, अशा वेळेला साप, विंचू बाहेर आलेले असतात. कापलेल्या कडपांखाली धान्य खान्यासाठी आलेल्या उंदरांच्या शोधात साप असतात. त्यांना डिवचल्यावर ते दंश करतात यासाठी शेतकर्यांनीही काळजी घ्यावी, असे त्यांना वाटते.
सर्पदंशावर लेक्चर दिलेले आहेत. यातून रुग्ण मृत्यूमुखी का पडतात याची कारणे अगदी शुल्लक असल्याचे दिसून आलेले आहे. संशोधनातून चांगल्या प्रतिलसी शोधण्यात आलेल्या आहेत.
सर्पदंश होणारे साधारण गरीब कुटुंबातीलच असतात, ते सरकारी रुग्णालयांचा आधार घेतात. सर्वसामान्यांचा विचार करून पुरेसा लसीचा साठा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.
– डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्य चिकीत्सक.
साप चावताच काय काळजी घ्यावी –
* जखम स्वच्छ पाण्याने धुवा.
* सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा.
* पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे.
* सर्पदंश झालेला भाग असेल तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे.
* सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये.
* दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये
*.डॉक्टरांना कल्पणा द्यावी जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल.
सर्पदंशाबद्दलच्या गैरसमजूती आणि घ्यावयाची काळजी –
*सापाचे विष मंत्राने उतरत नाही
*सर्पदंशावर प्रतिसर्प (स्नेक अँटिव्हेनिन) विष हे एकमेव औषध आहे.
*व्यक्तीला कडूलिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नका
*जागेवर कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका
*धोत-याच्या बिया वगैरे खाण्यास देऊ नका.
*गरम केलेले लोखंड लावणे (डागण्या देणे) चुकीचे आहे
*दंश केलेला साप मारून अथवा जिवंत डॉक्टरांकडे नेऊन दाखवू नका.
*सर्पदंश होताना तो उलटला तरच विषबाधा होते हे चुकीचे आहे
*व्यक्तीने एकट्याने दवाखान्यात न जाता सोबत सहकारी घेऊनच जावे.
*दंश झालेल्या व्यक्तीने कोणतेही वाहन चालवू नये.