उसनवारीच्या पैशांच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी धक्कादायक प्रकार घडला.

0
69

उसनवारीच्या पैशांच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास रोहणा-निमकोहळा रस्त्यावरील एका पाड्यात घडला.

या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, खामगाव तालुक्यातील रोहणा निमकोहळा रस्त्यावर पारधी पाडा आहे. या पाड्यातील एका कुटुंबियांना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पेनसावंगी येथील राजू सोनू भोसले यांनी दहा ते बारा वर्षांपूर्वी तीन लाख रूपये उसने दिले आहेत.

उसनवारीचे पैसे घेण्यासाठी राजेंद्र सोनू भोसले आणि त्यांची पत्नी अनिता भोसले गुरूवारी रोहणा येथे आले. त्यानंतर पारधी तांड्यात गेले. यावेळी त्यांचा वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन, छर्याच्या बंदुकीचा वापर झाल्याने, एकाचा जागीचा मृत्यू झाला.

तर दोघे जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक आणि जखमींना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला असून, आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजते.

एकाचा घटनास्थळीच मृत्यू
या घटनेत राजेंद्र सोनू भोसले रा. पेनसावंगी ता. मेहकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर शांताबाई प्रकाश पवार ६५ आणि िवलास प्रकाश पवार ४५ अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here