गगनगिरी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेकडून मधमाशी पालन प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न.

0
239


प्रतिनिधी: सुदर्शन पाटील


मधमाशी आहे म्हणून सजीवसृष्टी आहे, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध आहे. मधमाशी पालन केवळ मधासाठी नसून परागीभवनासाठीही आहे. ज्याद्वारे पीक उत्पादन वाढीस मदत होते. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला तसेच फूलशेती अशा अनेक पिकांमध्ये याचे उत्तम परिणाम दिसत असल्याने हा व्यवसाय करण्यास भरपूर वाव व संधी आहेत. मधमाशीपालन व्यवसाय म्हणून कसा करावा, मध उत्पादन घेण्यापासून ते मधमाशीपालनात उद्योजक कसे व्हावे, याविषयी प्रात्यक्षिकांवर आधारित दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिर गगनगिरी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेकडून गगनबावडा तालुक्यातील शेनवडे या ठिकाणी घेण्यात आले.


शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिका पालन या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रशिक्षक नामदेव पाटील यांनी मधुमक्षिका पालनाचे शेतीतील महत्त्व सांगून शेती उत्पादनाला शेती पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय शेतकरी गटांमार्फत करावा असे आवाहन केले. मधुमक्षिका पालन हे कमी जागेत व हमखास उत्पादन देणारे व शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे सांगितले. डोंगर भागातील असलेली नैसर्गिक साधन सामुग्रीचा उपयोग करून मधुमक्षिका पालन करणं हे शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरेल.

मधुमक्षिका पालनातून मधा व्यतिरिक्त परागकण, रॉयल जेली, मेन इत्यादी उत्पादने मिळू शकतात व त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली. पंचायत समिती गगनबावडा कृषी विस्तार अधिकारी यांनी शासनामार्फत असलेल्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षक नामदेव पाटील यांनी लाभार्थ्यांना मध पेट्या हाताळण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले. बापू जाधव यांनी प्रास्ताविक केले तर मीना सावंत यांनी आभार मानले.

Sp9 साठी गगनबावडाहून उत्तम पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here