महाराष्ट्र हाउसिंग फायनान्सवर पुन्हा शरद पवार गटाचे वर्चस्व, निवडणूक प्रथमच बिनविरोध

0
62

कोल्हापूर : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स काॅर्पोरेशनची संस्थेच्या स्थापनेनंतर साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली. या संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच गटाने पुन्हा वर्चस्व मिळवले.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट, भाजप, काँग्रेससह शिवसेना ठाकरे गट एकत्रित येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले. मावळते अध्यक्ष व्ही. बी. पाटील, सांगलीच्या जयश्री पाटील यांना पुन्हा संचालक मंडळात संधी मिळाली.

बिनविरोध निवडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, अंकुश काकडे, आमदार अशोक चव्हाण अशा सर्वपक्षीय नेते मंडळींनी पुढाकार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी नागपूरच्या दोन जागा वगळता २३ जागा बिनविरोध झाल्या.

पक्षीय बलाबल असे :

  • राष्ट्रवादी-शरद पवार गट : ११
  • भाजप : ०५
  • काँग्रेस व अजित पवार गट : प्रत्येकी ०३
  • ठाकरे गट : ०१

बिनविरोध निवडलेले संचालक असे :

मुंबई विभाग : प्रकाश यशवंत दरेकर, सीताराम बाजी राणे, ॲड. दत्तात्रय शामराव वडेर. नाशिक विभाग : प्रथमेश वसंत गीते, ॲड. वसंतराव पंढरीनाथ तोरवणे, डॉ. सतीशराव भास्करराव पाटील, विजय शिवाजीराव मराठे.
पुणे विभाग : व्ही. बी. पाटील, सागर उल्हास काकडे, शिवाजीराव रामचंद्र शिंदे, वृषाली ललित चव्हाण.
छत्रपती संभाजीनगर विभाग : सुनील देविदास जाधव, दिलीप बाबुराव चव्हाण, हरिहरराव विश्वनाथराव भोसीकर, जयसिंग शिवाजीराव पंडित, रवींद्र देवीकांतराव देशमुख.
अमरावती विभाग : दीपक शेषराव कोरपे, नितीन तुळशीदास भेटाळू :
महिला संचालक : जयश्री मदन पाटील, शैलजा सुनील लोटके.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : वसंतराव विश्वासराव घुईखेडकर.
अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी : सिद्धार्थ तातू कांबळे,
भटक्या विमुक्त जाती : बाळासाहेब महादू सानप.

नागपूर विभागात लढत

संस्थेच्या नागपूर विभागात मात्र बिनविरोध करण्यात यश न आल्याने निवडणूक लागली असून, त्यामध्ये त्र्यंबक शंकरराव खरबीकर, विनोद बाबाराव ढोणे, राकेश मुकुंदरावजी पन्नासे, डॉ. महेश देवराव भांडेकर यांच्यात लढत होत आहे. २४ डिसेंबरला त्याचे मतदान होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here