सावधान! तरुणीशी चॅटिंग करण्याच्या नादात जळगावचा गौरव बनला पाकचा हेर

0
140

जळगाव : सोशल मीडियावर युवतींशी ‘चॅटिंग’ करण्याचा नाद लागला आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ यंत्रणेत काम करीत असल्याचे सांगणाऱ्या युवतीने प्रेमाचा बनाव केला आणि गौरव पाटीलही तिच्याशी सूत जुळवून बसला.

संबंधित युवतीने गौरवला पैसे पुरवायला सुरुवात केली. प्रेम व पैशाच्या मोहात गौरवने ‘नेव्हल डाॅकयार्ड’ची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविली. बँक व्यवहाराच्या माहितीवरून पाक यंत्रणेच्या हाती गौरव अडकला.

मूळ पाचोरा येथील असलेला गौरव सध्या ठाण्यात वास्तव्यास आहे. सोशल मीडियावरून तरुणींशी चॅटिंग करताना पाकच्या गुप्तचर विभागातील हस्तकाने एका युवतीच्या माध्यमातून त्याला हेरले.

गौरवकडून गोपनीय माहिती मिळताच त्याला पाकिस्तानच्या यंत्रणेने कामाला लावले. गौरवला पैशांचे आमिष दिल्यावर तो युवतीच्या प्रेमापायी गोपनीय माहिती पुरवू लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here