तीन शाळकरी मुलींना एकाच वेळी डेंग्यूची लागण

0
91

सोलापूर : बोरी उमरगे (ता.अक्कलकोट) येथे एकाच वेळी तीन शाळकरी मुलींना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत.

उमरगे येथील पूर्वा सुधीर पुजारी (वय ५), अमुली लक्ष्मीकांत कोळी (वय ०६), समीक्षा सुधीर पुजारी (वय ०७) या तिन्ही मुलींना मागील तीन दिवसांपूर्वी सतत ताप, थंडी, अंगदुखी, कणकणीचा त्रास होता.

तिघीही सतत आजारी पडत होत्या. सुरुवातीला किरकोळ उपचार घेत होते. मात्र, खरे नसल्याने शेवटी अक्कलकोट येथील बाह्यवळण रस्त्यावरील एका नामवंत बालरोग तज्ज्ञाकडे तपासणी केली. त्यानंतर, डेंग्यूची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये दिसले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या बऱ्या आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

ही घटना घडून पाच दिवस उलटून गेले असले, तरी विचारपूस करणे किंवा पुन्हा इतरांना होऊ नये, म्हणून संबंधित यंत्रणेतील कोणीच फिरकले नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अक्कलकोट शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात ही स्थिती आहे, तर कर्नाटक, महाराष्ट्र सीमेवरील गावात काय परिस्थिती असेल, असा सवाल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here