अवयव विक्री ची चर्चा ही अवयवदान कायदा विरोधी: योगेश अग्रवाल
संपादक : डॉ. सुरेश राठोड
कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी यशोदर्शन फाउंडेशने केलेल्या पत्रव्यवहाराचा विचार करून, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांनी पोलीस कल्याण उपक्रम अंतर्गत अवयव दान जनजागृती प्रबोधन व्याख्यानला पत्राद्वारे मान्यता दित, जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे उपविभागीय अधिकारी यांना माहितीस्तव प्रत देण्यात आले. या विनंतीला मान देऊन, मंगळवार 19 डिसेंबर 2023 रोजी पहिले जनजागृती व्याख्यान करवीर पोलीस ठाणे येथे घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते योगेश अग्रवाल, महाराष्ट्र पोलीस मित्र चे मुख्य कार्याध्यक्ष व एस.पी.9 न्यूज चॅनल चे संपादक डॉ.सुरेश राठोड, डॉ सुशील अग्रवाल, रेखा बिरांजे यांचे स्वागत पोलीस उपनिरीक्षक निवास पवार व जालिंदर जाधव यांनी केले.
यावेळी, डॉ.राठोड म्हणाले, आपल्या जिल्ह्याला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांच्यासारखे अधिकारी लाभले, हे आपले भाग्य आहे. पोलीस कल्याण उपक्रमाच्या माध्यमातून, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांचा विचार करून, व्याख्यान आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. म्हणूनच आज यशोदर्शन फाउंडेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही येथे आलो आहोत.
यानंतर प्रमुख वक्ते योगेश अग्रवाल यांनी अवयव दान हे श्रेष्ठदान आहे. याचे मार्गदर्शन व महत्त्व पटवून देत, म्हणाले, अवयव विक्रीची चर्चा करणे हे अवयव दान कायद्याच्या विरोधात आहे. असे अनेक मुद्दे सांगत अवयव दान प्रबोधन व्याख्यान उत्कृष्टरित्या पटवून दिले.
यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर, पोलीस अधिकारी, अमलदार, पत्रकार व सर्व कर्मचारी उपस्थित होते. आभार डॉ सुशील अग्रवाल यांनी केले.