कोल्हापुरातून , शनिवार दि. १२ ऑगस्ट आणि सोमवार, दि. १४ ऑगस्ट रोजी जाणारी आणि गोंदियातून सोमवार, दि. १४ आणि बुधवार, दि. १६ रोजी येणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वे रद्द केल्याने या रेल्वेतून येणाऱ्या सुमारे १२०० प्रवाशांना याचा फटका बसला. , शनिवारी ही गाडी जेव्हा कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आली तेव्हा सुट्टीवर आलेल्या प्रवाशांची मोठी गर्दी होती.
भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे तसेच यार्ड पुनर्दुरुस्तीचे तांत्रिक काम केले जाणार आहे, म्हणून या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांवर याचा परिणाम झाला. यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या जाणाऱ्या दोन आणि येणाऱ्या दोन अशा चार फेऱ्या रद्द केल्यामुळे अनेक प्रवाशांना याचा भुर्दंड बसला.
कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनाला जोडून येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी असतानाच महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या अचानक रद्द केल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे सहलीच्या बेतावर विरजण पडले आहे.
अनेकांना सहलीचा बेत रद्द करावा लागला तर काहींना खासगी बसच्या वाढीव तिकिटांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.