कोल्हापूर: कौलालंपूर (मलेशिया) येथे झालेल्या १० ते १८ डिसेंबर दरम्यान झालेल्या एशियन क्लासिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत कोल्हापूरच्या उत्कर्ष चव्हाणने ८३ किलो गटात रौप्य पदकाची कमाई केली.
तर डेड लिफ्टमध्ये सुवर्ण, तर स्काॅट व बेंच प्रेसमध्ये रौप्य पदकाची कमाई केली.
उत्कर्षने यापुर्वी उत्तराखंड (काशीपूर) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे तो दिव्यांग आहे. त्याने दिव्यांगावर मात करीत आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याच्यावर शाबासकीची थाप पडत आहे.
तो ज्येष्ठ प्रशिक्षक बिभीषण पाटील यांच्याकडे नियमित सराव करीत आहे. त्याने सातत्याने केलेल्या सरावामुळे त्याला हे यश मिळाल्याचे त्याचे प्रशिक्षक पाटील यांनी सांगितले
. त्याला महाराष्ट्र पाॅवर लिफ्टींग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई, वडील उत्तम चव्हाण, प्रा. डाॅ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.