राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नुकताच भाजपची घरोबा केला त्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री पद स्वीकारावे अशी मागणी आम्ही करत आहोत कोल्हापूर मध्ये महापालिका आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी या महत्त्वाच्या पदांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत .
सगळा कारभार प्रभारींवर चालू आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्त पद आहे पण ते महापालिकेत जात नाहीत महापालिकेतील फाईल मागवून क्लिअर करतात कदाचित त्यांना आयुक्त म्हणून महापालिकेमध्ये जाणे कमीपणाचे वाटत असेल. खंडपीठ ,शहराची हद्दवाढ, पंचगंगा प्रदूषण यासह अनेक मोठे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
अजित पवार यांच्यासारखा कणखर प्रशासनावर वचक असणारा कार्यतत्पर निर्भिड मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झाला तर अनेक प्रश्न मार्गी लागतील.
त्यांचा प्रशासनावर एक दरारा असून कोल्हापुरातील मुर्दाड अधिकारी वटणीवर आणण्याचे ते काम करू शकतात . वित्त मंत्री असल्याने कोल्हापूरला विकास निधी सुद्धा कमी पडणार नाही.
अपवाद वगळता यापूर्वीचे पालकमंत्री निष्प्रभ ठरलेले आहेत फारसा प्रभाव त्यांचा दिसून आला नाही किंबहुना पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्याला आहे असे वाटले नाही .
अजित दादा पवार यांनी कोल्हापूरचे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवले तर करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या कृपेने त्यांच्या मनामध्ये असणारी राजकीय महत्त्वकांक्षा कदाचित पूर्ण होईल.
अजित दादा पवार यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अहोरात्र जनतेसाठी कष्ट घेणारा नेता कोल्हापूरचा पालकमंत्री व्हावा असे आमची भावना आहे .
अजित पवार यांनी लक्ष घालून तातडीने कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ते कोल्हापुरात येत असताना आम्ही करत आहोत.