दुध व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रापंचिक छोट्या – मोठ्या गरजा पूर्ण करीत मुलांची भावी पिढी चांगली घडविणेसाठी फार मोठी मदत झाली आहे.आजपर्यत झालेल्या विकासात दुध संस्थाचे योगदान फार महत्वाचे आहे. तसेच येणाऱ्या काळात अनेक आव्हाने येत आहेत यासाठी सहकारी दूध संस्था टिकवित त्यांची शक्ती वाढवून त्यांचे पावित्र्य राखण्याचे काम सर्वानी प्रामाणिकपणे केले पाहिजे.आपल्या राजकारणातून कार्यकर्त्यास मदत करता यावी ही विधायक भूमिका घेवून आपण व अमरसिंह पाटील (भाऊ) एकत्रित आल्याचे प्रदिपादन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले…
तसेच दुध उत्पादकांच्या सहकार्यामुळे दुधसंकलन प्रतिदिन १२ लाख लिटर्सवरून १५ लाख लिटर्स नेणेत यश आले आहे. तर २० लाख लिटर्स संकलन करण्याचे ध्येय असून दुध उत्पादकांना वाजवी दरात पशुखाद्य देत संघामार्फत जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणेसाठी प्राधान्य देणेचा नेहमी प्रयत्न करणार असल्याचे गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील यांनी सांगितले…
यावेळी गोकुळ दूध संघांचे संचालक अजित नरके,चेतन नरके,माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील,सर्वोदय सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण कुलकर्णी,कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहूल पाटील,नंदन पाटील,कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई,पांडुरंग काशिद,कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे,वारणा साखर कारखान्याचे संचालक रविंद्र जाधव (सरपंच),सुरेश पाटील,कोडोली गावच्या सरपंच भारती प्रकाश पाटील,माजी सरपंच मनिषा रणजीत पाटील,विश्वास पाटील,खंडेराव हिरवे,उत्तम पाटील,प्रकाश पाटील,माणिक मोरे,बाजीराव केकरे,डॉ.सतिश पाटील,माधव पाटील,गणेश शेंडगे यांच्यासह विविध दुध संस्थेचे संचालक,सभासद व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते…