विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा : अभिनेत्री सोनाली पाटील

0
92

SP9 कोकरूड /प्रतिनिधी प्रतापराव शिंदे

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील यांनी केले. त्या दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी तालुका शाहुवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होत्या.

यावेळी चित्रपट निर्माते सुनील भोसले, दत्तसेवा सहकारी पतपेढीचे संस्थापक आनंदराव मांईंगडे, धन्वंतरी हाॅस्पिटल कोकरूडचे संस्थापक डॉ. एस. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना अभिनेत्री सोनाली पाटील पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याकडे गुणवत्ता आहे. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

ती गरज ओळखून दत्तसेवा समुहाचे संस्थापक आनंदराव मांईंगडे यांनी उभारलेल्या दत्तसेवा विद्यालयात सर्व सोयी नियुक्ती शिक्षणाची संधी येथील मुलांना मिळत आहे.

यावेळी निर्माते सुनील भोसले म्हणाले की, दत्तसेवा विद्यालयातील सोयी सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे. संस्थापक आनंदराव मांईंगडे यांनी तुरुकवाडी येथे दर्जेदार शिक्षणाची सोय केली आहे.

याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी. याप्रसंगी धन्वंतरी हाॅस्पिटल कोकरूडचे संस्थापक डॉ. एस. एन. पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी रविवारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व सोमवारी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.


या कार्यक्रमास डॉ. पंकज पाटील प्रा. एच.पी.पाटील, प्रा. अजय पाटील, माजी सरपंच शिवाजीराव सोनवले, डॉ. एन. पी. पाटील, ॲड. सतिश मांईंगडे, दिप्तीताई मांईंगडे, स्नेहा सावंत, एकांक सावंत,
दत्तसेवा पतपेढीचे मुख्य व्यवस्थापक नंदकुमार पाटील,
डॉ. बाळासो पाटील, जे. एस. पोतदार, मुख्याध्यापक गणेश पाटील, विरळचे माजी सरपंच कृष्णा पाटील, ,मुख्याध्यापिका लता हारुगडे, सर्जेराव पाटील कृष्णा पाटील, आनंदा पाटील, तानाजी बामणे, पांडुरंग सावंत यांच्यासह दत्तसेवा सहकारी पतपेढीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, दत्तसेवा विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ,पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here