प्रतिनिधी: प्राध्यापिका मेघा पाटील
नागपूर दि २५. डिसेंबर २०२३ रोजी हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा, भारत. नागपूर जिल्ह्याच्या वतीने त्रिसूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दिनदर्शिका प्रकाशन, गोस्वामी शौर्यगाथा पुस्तकाचे प्रकाशन व ध्यानाकडून ज्ञानाकडे संस्थापक अध्यक्ष हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा कार्यक्षेत्र भारत व आंतरराष्ट्रीय योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी यांचे मार्गदर्शनात भरगच्च कार्यक्रम शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना योगेश बन यांनी समाजप्रबोधन करताना हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी समाजाने काळाची पावले ओळखून संघटित होणे काळाची गरज असल्याचे आवर्जून सांगितले.
समाज, राष्ट्र सन्मार्गावरून चालायला पाहिजे माणसांनी माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे हा मानवता धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे म्हणजे कुठेही जातीय सामाजिक भेद किंवा तेढ निर्माण होणार नाही. समाजाने शिक्षण, क्रीडा, आर्थिक, संस्कृतीक, सामाजिक सर्व क्षेत्रात शिक्षणाची कास धरून पुढे गेले पाहिजे असे आव्हान योगेश बन यांनी केले. गोसावी समाजाचे मुख्य काम समाजाला हा भिक्षा मागून दीक्षा देण्याचे कार्य आहे म्हणजेच आम्ही हे अनादी काळापासून करत आहोत. असं मत कार्यक्रमाच्या उद्घाटिका राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ. उर्मिलाताई भारती यांनी व्यक्त केलं. मध्य प्रदेशचे प्रमुख राष्ट्रीय सचिव अतिथी महंत शिवसुंदरगिरी महाराजांनी कुंभमेळ्यात शाही स्नानाचा पहिला मान गोस्वामी समाजाच्या आखाड्याला मिळावा अशी मागणी केली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व्यंकटेश पुरी यांनी समाजाचा इतिहास सांगितला. विदर्भाच्या अध्यक्षा मेघाताई भारती यांनी समाज संघटनावर जास्त भर दिला. समाज संघटन होणं ही काळाची गरज आहे.
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या प्रमाणे चालण्याचा मार्ग त्यांनी सांगितला. अनिल पुरी यांनी कार्यकर्त्यांनी कार्य करीत असताना मतभेद बाजूला सारून मनभेद होऊन देता कार्य करावे असे सांगितले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक धर्मवीर भारती यांनी शिक्षणासोबतच दरोजगार व व्यवसायाकडे युवकांनी वळले पाहिजे असे मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष महेंद्रगिरी, संगीता भारती, सहाय्यक उपायुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती आदिवासी विभाग बबीता गिरी,वरिष्ठ लेखाधिकारी ट्रेझरी सतीश गोसावी, अशोक गिरी,भैय्या भरती यांनी आपले विचार मांडले. यावेळी गोस्वामी शौर्यगाथा पुस्तकाचे लेखक प्राध्यापक वसंत गिरी मेहकर यांनी गोस्वामी समाजाचा जाज्वल्य इतिहास, शौर्य इतिहासात गोसावी समाजाचे योगदान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाड्याचे जिल्हाध्यक्ष गणेश पुरी कार्यक्रमाचे आयोजन करून नेहमी वर्षभरात समाजासाठी वेगवेगळे उपक्रम त्यांचे चालू असतात. समाज संघटन वाढवणे यावर त्यांचा जास्त कल असतो. स्वागत अध्यक्ष अशोक गिरी बाबा गिरी यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ अध्यक्ष मेघाताई भारती यांनी, संचालन अलकाताई पुरी यांनी तर आभार प्रदर्शन नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश पुरी यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश पुरी, दिलीप भारती,विजय रामुई गिरी, शंकर पुरी यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागपूर शहरातून आलेल्या समाज बांधवांची उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कृष्णदेव गिरी यांच्या मार्गदर्शनात हा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती नागपूर जिल्हाध्यक्ष गणेश पुरी यांनी दिली.