कृषीसेवा रत्न पुरस्काराने प्रदीप गावडे सन्मानित..

0
148


प्रतिनिधी : सौरभ पाटील
गगन बावडा तालुक्यातील कृषी सहायक श्री प्रदीप गुंडा गावडे यांना यावर्षी चा कृषी सेवा रत्न हा पुरस्कार माननीय आमदार पी एन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्याच्या बांधा पर्यंत पोहोच व्हाव्यात यासाठी शासन विविध उपक्रम हाती घेत असते .प्रदीप गावडे यांच्या कृषी क्षेत्रामधील आदर्शवत उपक्रमाची दखल घेऊन
कोल्हापूर मधील तपोवन येथे सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनां तील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . ते पन्हाळा येथील आळवे गावचे सुपुत्र आहेत .त्यांच्या या केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
या कार्यक्रमाला माननीय आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे माननीय आमदार जयंत आसगावकर व जिल्ह्यातील शेतकरी व शेती अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here