अवनि संचलित “स्वयंपूर्णा गृहउद्योग” महिलांना देणार नवीन दिशा.
प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील
कोल्हापूर: अवनी संस्थेच्या माध्यमातून जवळील पाच गावातील महिला बचत गटांच्या कडून बनवलेल्या सेंद्रिय उत्पादनांची बाजारपेठ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून त्या महिला स्वयंपूर्ण होतील स्वतःच्या पाया वर उभ्या राहतील, याचं उद्देशाने हा उद्योग उभा करण्यात आला आहे.
या दालनामध्ये महिलांनी उत्पादित केलेली उत्पादने उपलब्ध होणार आहेत. यामध्ये विविध प्रकारचे चविष्ट मसाले,चटणी, लोणचे असणार आहे. तसेच कमवा शिका उपक्रमा अंतर्गत 18 वर्षावरील मुलींनी बनवलेली उत्पादने देखील उपलब्ध असणार आहेत यामध्ये पायपुसणी,कापडी पिशव्या, तसेच शोभेच्या वस्तू देखील असणार आहेत. युवकांच्यासाठी टी शर्ट,कॅप, बॅच, बुकमार्क यासारख्या वस्तू देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्वयंपूर्ण गृह उद्योग या दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या दालनाला ग्राहकांनी भेट देऊन उत्कृष्ट दर्जाची सेंद्रिय उत्पादने तसेच कमवा शिका योजनेअंतर्गत मुलींनी बनवलेल्या वस्तू खरेदी करून संस्थेत सहकार्य करावे असे आवाहन अवनीच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले आहे.
#अवनि #kolhapurkar #loksatta #महाराष्ट्र #motivation #childcare #avani #कोल्हापूर #women #indian