संगमनेर मध्ये एसटीचा भीषण अपघात; विद्यार्थ्यांनी भरलेली बस पलटी ; अपघातात ४० विध्यार्थ्यी जखमी…

0
93

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा.

अहमदनगर : संगमनेरमधून भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी बस पलटी झाली. या बसमधून मोठ्या संख्येने महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते. विद्यार्थ्यांसोबत काही नागरिक देखील या बसमध्ये होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही बस राहुरीहून आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे निघाली होती. मात्र पिंपरणे गावात पोहोचल्यानंतर बसचा रॉड तुटला.

बसचा रॉड तुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.या बसमध्ये साधारण चाळीस विद्यार्थ्यांसह काही नागरीक प्रवास करत होते, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. मात्र काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं उपचारासाठी संगमनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पालकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here