कलाविश्वात आज असंख्य कलाकारांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात काही जणांनी प्रसिद्धी, यशाचं शिखर गाठलं आहे. तर, काही जण अपार लोकप्रियता मिळवूनही इंडस्ट्रीपासून दूर गेले आहेत.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. करिश्मा कपूरसोबतबॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या या अभिनेत्याने पहिल्याच सिनेमातून लोकप्रियता मिळवली. परंतु, वाढलेल्या वजनामुळे त्याला इंडस्ट्रीने बाहेरचा रस्ता दाखवला.
सध्या नेटकऱ्यांमध्ये अभिनेता हरीश कुमार याची चर्चा रंगली आहे. वयाच्या १५ व्या वर्षीच सुपरस्टार होणाऱ्या या अभिनेत्याने बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर प्रेम कैदी (Prem Qaidi) या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी तो प्रेमा खैदी (Prema Khaidi) या तेलुगू सिनेमात झळकला होता. हा तेलुगू सिनेमा हिट झाल्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
हरीशने करिश्मा कपूरसोबत ‘प्रेम कैदी’ या सिनेमात काम केल्यानंतर तो ‘तिरंगा’, ‘कुली नंबर 1’ यांसारख्या सिनेमातही झळकला. परंतु, त्यानंतर त्याला काम मिळणं बंद झालं. आज हा अभिनेता इंडस्ट्रीपासून चांगलाच दुरावला आहे.