कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांची भूमिका संशयास्पद.….संजय पवार

0
60


दि.27-12-2023

प्रतिनिधी सौरभ पाटील
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर होऊन कोल्हापूरकरांना चांगले रस्ते मिळावेत या हेतूने महाराष्ट्र शासनाने रुपये 100 कोटी इतका निधी मंजूर केला. परंतु अनेक कारणाने हा 100 कोटींचा रस्ते प्रकल्प वादग्रस्त बनत चालला आहे.
कोल्हापूर शहरातील नागरिकांना चांगले व दर्जेदार रस्ते लवकरात लवकर व्हावेत ही अपेक्षा असताना कोणाचातरी बालहट्ट पुरवण्यासाठी व आपली खुर्ची वाचवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध कारणाने काम सुरू करण्यासाठी दिरंगाई करत आहे.
या शंभर कोटींच्या रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार झाले, रीतसर निविदा निघून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या, ठेकेदार निश्चित झाले आणि मग आता, सर्वेच्या नावाखाली आम्हाला मूर्ख बनवण्याचे काम प्रशासकांनी करू नये.
वास्तविक महानगरपालिका प्रशासनाने कोणात्या तरी राजा टक्केवारीच्या, टक्केवारीसाठी काम न करता, जनतेच्या हिताचे काम करावे. कारण एप्रिल,मार्च नंतर प्रत्येक वस्तूवर दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर असे झाले तर पुन्हा भुर्दंड जनतेच्या माती बसणार आहे.
तरी प्रशासकांना विनंती आहे रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरू करून दर्जेदार रस्ते कसे होतील याकडे लक्ष द्यावे व आपण दिलेल्या मुदतीत काम सुरू करावे अन्यथा शिवसेना आपल्या विरोधात जोरदार आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here