प्रतिनिधी: स्नेहल घरपणकर
सांगली विश्राम गृह येथे महिला आघाडी पदाधिकारी आढावा बैठक व
सौ छायाताई शिंदे यांचा सत्कार वतीने करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना सौ छायाताई शिंदे म्हणाल्या गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक १०० शिवसेना महिला आघाडीच्या शाखा उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट असून कोरोना काळात उद्धव साहेबांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे असे मुख्यमंत्री लाभले हे आपले भाग्यच आहे आणि त्यांचे विचार घरोघरी पोहचून जोमाने कामाला लागून उद्धव साहेबांचे हात बळकट करुया २०२४ ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेब यांना बसवायचे आहे आणि तुम्हाला काही अडचण आल्यास मी तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे तुम्ही कामाला लागा.
सांगली जिल्हा संघटिका
सुजाताताई इंगळे म्हणाल्या छायाताई शिंदे आणि मी जिल्हा संघटिका म्हणून दोघी काम करत होतो छायाताईच्या कामाची दखल घेऊन उद्धव साहेबांनी एक सामान्य कुटुंबातील महिला उपनेते पदी निवड केली याबद्दल खूप आनंद होत आहे आणि छायाताई तुमच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीचे काम आम्ही प्रामाणिकपणे सर्व महिला घराघरापर्यंत पोहोचवून उद्धव साहेबांचे हात बळकट करू.
नसिमा शेख रेगझीन इंडस्ट्रीज मिरज यांनी उपस्थित राहुन महिलांना मार्गदर्शन केले
यावेळी नवीन महिला पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.
सुजाताताई इंगळे (सांगली जिल्हा संघटिका) तमन्ना सतार मेकर( मिरज तालुका संघटिका), अश्विनी मोकळे (उपजिल्हा संघटिका तासगाव), शोभा पिसाळ (तासगाव तालुका संघटिका) मदिना जाधव( मिरज तालुका संघटिका) सुनीता थोरात (तासगाव शहर संघटिका)
रेखा चौगुले( मिरज शहर संघटिका)
सुलोचना माने (सांगली शहर संघटिका)
उषाताई माने
(कवठेमंकाळ उपजिल्हा संघटिका)
पूजा वाघमारे (सांगली उपशहर संघटिका)
बेबी तांबोळी( मिरज तालुका उपसंघटिका)
आशा पाटील (कुपवाड शहर संघटिका)
वंदना लेंगरे( तासगाव उपशहर संघटिका)
वर्षा सर्जे (तासगाव उपशहर संघटिका) महिला उपस्थित होत्या.