कोल्हापूर : गेली दोन महिने कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त (प्रशासक) पद रिक्त आहे. त्यामुळेत्वरित नेमणूक करावी. अशी मागणी कोल्हापुरातील शाहू विजयी गंगावेश तालमीचा मल्ल संग्राम कांबळे यांनी थेट मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली.
त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिकेला येत्या आठवड्यात आयुक्त तथा प्रशासक देवू, असे आश्वासन दिले.
महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त (प्रशासक) मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिकेला येत्या आठवड्यात आयुक्त तथा प्रशासक देवू, असे आश्वासन दिले.. त्या दिवसांपासून प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार आमच्याकडे प्रभार आहे. मात्र, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, पाणीपुरवठा, थेट पाईपलाईन प्रश्न, आगामी मनपा निवडणूक आणि त्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी, खासबाग कुस्ती मैदान संवर्धन तसेच शहरातील इतर नागरी आहे.
जिल्हाधिकारी प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे अनेक धोरणात्मक निर्णय घेताना त्यांना अडचणी येत आहेत.समस्यांचा व सुविधांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, तरी आपण या विषयी तत्परपणे योग्य तो निर्णय घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेचे रिक्त असलेले आयुक्त पद भरावे.
अशी मागणी कांबळे यांनी मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट भेट घेऊन केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कांबळे यांना एक आठवड्यात कोल्हापूर महापालिकेस आयुक्तांची नेमणूक केली जाईल याशिवाय इतर रिक्त पदे ही भरली जातील असे आश्वासित केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य अधिकारी उपस्थित होते.