कोल्हापूर : के.एस.ए. फुटबॉल हंगामात यंदा परदेशी खेळाडूंना नो एन्ट्री, नोंदणी कधीपासून सुरु होणार..जाणून घ्या

0
78

कोल्हापूर : यंदाच्या फुटबाॅल हंगामाकरीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सोळा वरिष्ठ गट ‘अ’ संघ व खेळाडू नोंदणीस सुरुवात होईल. यंदा परदेशी खेळाडूंना स्थानिक संघातून खेळता येणार नाही. याबाबतची मार्गदर्शक सुचना भारतीय फुटबाॅल महासंघाने यापुर्वी जाहीर केली होती. त्यानूसार हा निर्णय नव्या फुटबाॅल हंगामसाठी लागू करण्यात आला आहे. या बैठकीसाठी मानद सरचिटणीस माणिक मंडलिक, प्रा.अमर सासने, राजेंद्र दळवी, संभाजीराव मांगोरे-पाटील, विश्वंभर मालेकर, दिपक घोडके आणि कोल्हापूर पोलिस संघ व झुंजार क्लब यांचे प्रतिनिधी सोडून उर्वरित १४ संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यंदाच्या नव्या फुटबॉल हंगामाकरीता के.एस.ए. ‘ए’ डिव्हीजनकरिता संघ व खेळाडू नोंदणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय फुटबॉल महासंघाच्या नियमावलीनूसार परदेशी खेळाडूंची नोंदणी करता येणार नाही असा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

के.एस.ए. कार्यालयात सोळापैकी १४ संघ आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.

नवी नियमावली अशी

  • एका संघात १६ ते २० खेळाडूंपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
  • जिल्ह्याबाहेरील भारतीय नागरिकत्व असणाऱ्या तीन खेळाडूंची नोंदणी करता येणार.
  • संघात १९ वर्षाखालील एक खेळाडू असणे बंधनकारक आहे.
  • बदली खेळाडू सुविधेत अ गटातील लीगचे सर्व सामने संपल्यानंतर नियमाप्रमाणे के.एस.ए. बी व सी डिव्हीजनमधील नोंदणीकृत खेळाडूंच्यापैकी एकूण पाच खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे.
  • जिल्ह्यातील नव्याने नोंदणी होणाऱ्या खेळाडूंसाठी रहिवास पुरावा म्हणून पाच वर्षांपुर्वी नाव नोंदणी असलेली रेशन कार्डची झेराॅक्स प्रत जोडणे अनिवार्य आहे.
  • बी डिव्हीजन लीगचे सर्व सामने संपल्यानंतर यातील खेळाडू ए डिव्हीजनमधील संघाना बदली खेळाडू सुविधेअंतर्गत घेता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here