मेंढपाळ बांधवांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत सरकारने कडक कायदा करावा

0
129

भारतीय संविधानाच्या कलम ३४२नुसार धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत आहे.परंतू राजकीय लोकांच्या नाकर्तेपणामुळे धनगर समाज अनेक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून व सवलतीपासून वंचित राहिला आहे

.धनगर समाज यासाठी अनेक वर्षापासून लढा देत आहे.या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे अपेक्षा करतो की त्यांनी त्वरित अध्यादेश काढून धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी व धनगर समाजाच्या हाती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे

महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मेंढपाळ बांधवांवर हल्ले होत आहेत व गावगुंडाकरवी मारहाण होत आहे.त्यांच्या शेळ्या मेंढ्याची चोरी होत आहे.मेंढपाळ बांधवांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत सरकारने कडक कायदा करावा व स्वसंरक्षणार्थ त्यांना शस्त्र परवाना देण्यात यावा.

तसेच शेळ्या-मेंढ्या व अन्य पाळीव प्राणी यांच्या चराईसाठी गायरान जमिनी आरक्षित ठेवण्यात याव्यात.या वर्षापासून शेळ्या-मेंढ्याचे लसीकरण प्रति शेळी किंवा मेंढी दहा रुपये प्रमाणे केले आहे.ते पूर्वीप्रमाणे प्रती शेळी किंवा मेंढी एक रुपया प्रमाणे करणे.

धनगर समाजासाठी घोषित केलेली एक हजार कोटी रुपयांची योजना त्वरित लागू करावी.प्रत्येक वर्षी योजना किती जनतेपर्यंत पोहचतात याचे सोशल ऑडिट व्हावे. अनेक योजना कागदावरच राहतात किंवा भ्रष्टाचार होऊन मधेच थांबतात.

अहमदनगर जिल्ह्याचे पु. अहिल्यादेवीनगर असे नामकरण करण्यात यावे. यासाठी यशवंत ब्रिगेड अनेक वर्षापासून लढा देत आहे.31मे रोजी मा.मुख्यमंत्री यांनी फक्त घोषणा केली परंतू अंमलबजावणी झाली नाही.त्याचबरोबर महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान किल्ले वाफगाव राज्य संरक्षित स्मारक व्हावे. महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान आहे. त्यांनी इंग्रजांना आपल्या पराक्रमाने हैराण करून सोडले होते.


महाराष्ट्रामध्ये पहिली ते दहावीच्या मुलींसाठी मोफत पु.अहिल्यादेवी होळकर एस. टी.पास योजना होती .ती बंद पडली आहे.ती योजना त्वरित सुरू करून पहिली ते पदवीत्तरपर्यंत करण्यात यावी. यामुळे महिला अधिक शिक्षित होतील.

सध्या होत असलेल्या भरती प्रक्रियामध्ये योग्य आरक्षणनुसार भरती होत नाही त्यामुळे योग्य आरक्षणनुसार भरती करण्यात यावी. ओपन मधून गेलेला व्यक्ती ओपनमध्ये ग्राह्य धरावा. त्यांची गणना परत रिजरवेशन मध्ये होऊ नये.नियमानुसार ३.५%आरक्षणनुसार धनगर समाजासाठी जागा मिळाव्यात.महाज्योती संस्था ओ.बी.सी वर्गासाठी चांगले काम करत आहे.परंतू महाराष्ट्रात ओ.बी.सी समाज प्रचंड प्रमाणात आहे.

त्यामुळे महाज्योती संस्थेचा विस्तार करून जिल्हानिहाय केंद्रे स्थापन करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे व योग्य मानधनाची व्यवस्था करण्यात यावी. स्पर्धा परीक्षा वेळीवेळी घेण्यात याव्यात व त्यांची फी योग्य असावी.

अशी मागणी सरकारकडे यशवंत ब्रिगेड अध्यक्ष प्रा.डॉ. संतोष कोळेकर यांनी केली या पत्रकार परिषदेस प्रा. डॉ. जी. बी. कोळेकर, प्रा. डॉ. लक्ष्मण करपे, प्रा. टी. के. सरगर, यशवंत ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे, रावसाहेब रानगे, विजय अनुसे, विकास घागरे, प्रकाश गोरड, सुरेश कोकरे, वैभव जानकर, सीमा झोरे,स्वाती वाघमोडे, स्वाती हजारे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here