शनिवार दि.12 ऑगस्ट2023 रोजी सायंकाळी 5.30 वा. शाहू स्मारक भवन येथे . स्व . अमोल किणीकर कला अकॅडमी रुकडी यांच्यावतीने ” गीत गाता चल” निर्मित व बिनॉय किणीकर प्रस्तुत ” सावन को आने दो” हा हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर झाला .
कै. अमोल किणीकर हे बिनॉय किणीकर यांचे वडील व मराठी फिल्म अॅक्टर व सहा दिग्दर्शक होते (कार्यकाल 1950 ते 1960 ) त्यांच्या आठवणीना उजाळा देत त्यांनी त्या काळी शिकलेली बायको, बायकोचा भाऊ, पाच चाकांची गाडी, व राजा शिव छत्रपती अशा अनेक चित्रपटात . प्रमुख भूमिका केलेल्या होत्या त्यातील शिकलेली बायको या चित्रपटास १९५७ साली फाळके पुरस्कार ही मिळाला होता .
अशी माहिती देत . त्यांनी सावन, बारीश, मौसम अशी गीत रचना असलेली गाणी सादर केली सुरवाती पासुनच प्रेक्षकांनी प्रत्येक गाण्यांना दाद देत वन्स मोअर दीले कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या मुळे प्रस्तुत करते बिनाँय किणीकर याचे सगळी कडून स्वागत होत आहे या कार्यक्रमामध्ये बिनॉय किणीकर, हेमंत पोळ, प्रज्ञा दिपक सावंत, जान्हवी म्हाकवे, यांनी प्रेक्षकाची मने जिंकली तर त्यांना मानसी, महादेवी यांचे व सुत्रसंचलन करणाऱ्या सिमा मुळेंची चांगलीच साथ मिळाली .
कार्यक्रमाचे उदघाटन
माजी उपमहापौर जोत्स्ना बाळासाहेब पवार- मेढे
बाळासाहेब पवार- मेढे , माजी अध्यक्ष मराठा बँक
प्रायोजक अरून चौगुले, सुमंगल मार्केटिंग चे मालक यांनी गणपती, सरस्वती, लक्ष्मी फोटोचे पुजन करून कार्यक्रमाची सुरवात केली . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बिनॉय किणीकर, हेमंत पोळ व मित्र परीवार यांनी अथांग परीश्रम घेतले .
Sp9 entertainment channel चे MD श्री सागर पाटील यांचे कलाकारांना कलाकारांना
प्रोत्सहन लाभले.
तसेच SP9 चे प्रतिनिधी
श्री गौरीशंकर संगोळी
कायर्कर्मास उपस्तित
होते असा कार्यक्रम कोल्हापूर मध्ये पहिल्यांदाच झाला .