भारतीय स्वातंत्र्य दिन दिनाचे औचित्य साधून व भारतीय जनता पार्टी पन्हाळा, करवीर व गगनबावडा तालुका यांच्या वतीने करवीर विधानसभा क्षेत्रामध्ये सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन कुंभी साखर कारखाना, कुडीत्रे या ठिकाणी मा.खासदार धनंजय महाडीकसो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
रॅलीचा शुभारंभ माजी आमदार अमलजी महाडिकसो यांच्या हस्ते झाला,रॅलीचे नेतृत्व करवीर विधानसभा प्रमूख मा. हंबीरराव पाटील व प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.अजय चौगले यांनी केले.रॅलीचे नियोजन संयोजक मंदार परितकर, अक्षय वरपे, प्रकाश पाटील, शशांक पारगावकर यांनी केले.
या मोटारसायकल रॅलीत सुमारे 300 कार्यकर्त्यांनी मोटरसायकलसह उत्साही सहभाग नोंदवला.
रॅलीची सांगता निवडे/साळवन या ठिकाणी झाली रॅली मार्गावर देशभक्तीपर उत्साही घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
समारोपाच्या ठिकाणी गगनबावडा तालुका अध्यक्ष मा. संदीप पाटील यांनी मेरी माटी मेरा देश अंतर्गत उपस्थितांना पंचप्राण शपथ दिली. तसेच निवडे येथील ज्योतिर्लिंग मंदिरात दिव्यांग आघाडी प्रमुख मा. गजानन सुभेदार यांच्या वतीने फाळणी दिनानिमित्त विभाजन विभिषिका छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
समारोपानंतर ज्येष्ठ नेते मारुतीराव परितकर, शिवाजी पाटील मामा,नामदेव पाटील काका, अमरसिंह भोसले यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जेष्ठ पदाधिकारी दत्ता मेडशिंगे, के.एन.पाटील, विस्तारक मा. अनिल पडवळ,संजय शेलार , जितेंद्र पाटील ,रामचंद्र देसाई ,सरदार खाडे, स्वप्नील शिंदे, चेतन पाटील, कृष्णात भोसले, दयानंद चौगले, विनोद दळवी, रघुनाथ झेंडे, प्रकाश उर्फ प्रल्हाद पाटील, युवराज पाटील, प्रताप काळे,सरदार हाराळे , सौ.सुशीला पाटील यांच्यासह करवीर विधानसभा मतदार संघातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी,शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.