तुफान अजून जिवंत आहे या सुरेश कांबळे लिखित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

0
17

प्रतिनिधी :जानवी घोगळे

” तुफान अजून जिवंत आहे” हा काव्यसंग्रह युवकांना प्रेरणा देईल. पाचव्या वर्षावास धम्म परिषदेत उपस्थित मान्यवर विचारवंतांचा लेखक सुरेश कांबळे यांच्या लेखणीला कौतुकास्पद सूर .

प्रसिद्ध कवी, बौद्ध साहित्याचे अभ्यासक , बहुजन चळवळीतील कार्यकर्ते,आयु. सुरेश कांबळे लिखित “तुफान अजून जिवंत आहे” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा वसंत मल्टीपर्पज सभागृह फुलेवाडी येथे झालेल्या पाचव्या ऐतिहासिक वर्षावास धम्म परिषदेत झाला.तथागत भगवान गौतम बुद्ध ,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, शाहू महाराज या महापुरुषांच्या विचारांचा जागर काव्याच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचावा व परिवर्तनाचा जागर व्हावा या हेतूने हा काव्यसंग्रह निर्माण केला आहे असे आपल्या मनोगतात लेखक, कवी सुरेश कांबळे यांनी सांगितले. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये “तुफान अजून जिवंत आहे” हे वैचारिक काव्यमय पुस्तक इथल्या युवा पिढीमध्ये विद्रोह- संघर्ष व स्वाभिमान जिवंत करणारे आहे. ते पुस्तक नवी दिशा देईल असे सांगून लेखक सुरेश कांबळे सर यांचं कौतुक केले.यावेळी प्रमुख वक्ते डॉ.अतुल भोसेकर,पाली भाषेचे अभ्यासक अमित मेधावी, भंते यश कश्यपायन, यांचे विचार या विचारपीठावर व्यक्त झाले. या कार्यक्रम प्रसंगी पाचवी वर्षावास धम्म परिषद, या परिषदेचे मुख्य संयोजक विजय कुशान,यांच्या पुढाकारातून हा प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी प्रकाशक, लेखक ,कवी,वनवा चित्रपटाचे निर्माते, एम.के. पब्लिकेशनचे प्रमुख आयु. मच्छिंद्र कांबळे,आयु.विद्याधर काळे, आयु.संदीप कांबळे, एलआयसी अधिकारी सुनील पाटील, महसूल अधिकारी प्रसाद पाटील, छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते, आंबेडकर चौक मित्र मंडळ पाडळी खुर्दचे सर्व कार्यकर्ते,धम्म निनाद फाउंडेशनचे सर्व संयोजक कार्यकर्ते, परिषदेसाठी उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच उपासक उपासिका, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विचारवंत, मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, कांबळे सरांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकसमूहाच्या साक्षीने हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय चंद्रकांत सूर्यवंशी, अध्यक्ष प्रा. डॉ. पी. एस. कांबळे, ध्वजारोहक मा.एल कांबळे, स्वागताध्यक्ष बाजीराव कांबळे, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख साहेब, रिंकू देसाई, आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here