इन्स्ट्राग्रामवर प्रेम फुलले, लग्नाचे आमीष दाखवून सर्वस्व लुटले; आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

0
106

 इन्स्टाग्रामवर मेत्री केल्यानंतर लग्नाचे आमीष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारिरीक संबंध प्रस्थापित करू तिचे सर्वस्व लुटणाऱ्या आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अमित सुनिल मालेवार (वय २९, रा. अभ्यंकरनगर, तुमसर जि. भंडारा ह. मु. बजाजनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ डिसेंबर २०२१ ते १० आॅक्टोबर २०२३ दरम्यान आरोपीचे हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया २५ वर्षीय युवतीशी इन्स्टाग्रामवर मेत्री झाली.

दोघेही खासगी जॉब करतात. इन्स्टाग्रामवर चॅटींग करताना ते ऐकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर आरोपी प्रियकराने तिला लग्नाचे आमीष दाखवून बजाजनगर येथील आपल्या किरायाच्या खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

युवतीने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बजाजनगर पोलिसात तक्रार दाखल केली. बजाजनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी बोरकर यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (एन) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here