प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील
राष्ट्रवादी पार्टीचे कागल येथील माजी उपनगराध्यक्ष नितीन कल्लाप्पा दिंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे.त्यांनी आतापर्यंत केलेले सामाजिक कार्य व पक्षासाठी अहोरात्र केलेली कामाची पोचपावती म्हणून या पदाची जबाबदारी पक्षाने दिली आहे.
मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास सतीश घाडगे सागर गुरव राकेश वाघमारे आधी उपस्थित होते.
नितीन दिंडे हे मंत्री मिश्रित यांचे समर्थक असून दोन वेळा कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत कागल शहरातील विविध संघटनाशी संबंधित आहेत.मंत्री हसनमुश्री यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी ही तत्काळ करणार आहे असे दिंडे यांनी यावेळी सांगितले.