लोकसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी मुदतवाढ; २२ जानेवारी पर्यंत होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

0
163

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बनवण्यात येत असलेली मतदार यादी अधिक बिनचूक व्हावी, यासाठी निवडणूक आयोगानं १२ राज्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी मुदतवाढ दिलीय.

आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड, उत्तरप्रदेश व दिल्ली या राज्यांसाठी ही मुदतवाढ लागू आहे. त्यानुसार १२ जानेवारीपर्यंत मतदार यादीतील दावे व हरकती निकाली काढली जातील.

१७ जानेवारीपर्यंत मापदंड तपासणे आणि मतदार यादी अंतिम करण्यासाठी आयोगाची परवानगी, त्या नंतर यादी अपडेट करण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी आता ५ जानेवारी ऐवजी नव्या निर्देशानुसार २२ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here