अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर
हरियाणा राज्यातील पानिपत येथे १४ जानेवारी १७६० साली पानिपतची तिसरी लढाई झाली होती. या दिवसाच्या स्मरणार्थ १४ जानेवारी या दिवशी हरियाणा राज्यातील पानिपतमध्ये मराठा चळवळीचे मातृसंस्था अखिल भारतीय मराठा जागृती मंचच्यावतीने ‘मराठा शौर्य दिवस’ साजरा केला जातो.
या शौर्य दिनाच्या स्मरणार्थ अखिल भारतीय मराठा जागृती मंचाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील ११० जण पानिपतला जाणार आहेत. यासाठी दोन टीम करण्यात आल्या असून एक टीम १० जानेवारी तर दुसरी टीम ११ जानेवारीला मिरज आणि पुण्यातून रवाना होणार आहेत.
‘मराठा शौर्य दिनासाठी पानिपतला जाण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील मो -८४८४८४०७७४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंचच्यावतीने करण्यात आल आहे. ‘मराठा शौर्य दिना’साठी कोल्हापुर जिल्ह्यातून जाणाऱ्या इच्छुकांची पानिपतमध्ये राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.