प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गोकुळ दूध संघाच्या सहयोगातून जातिवंत दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी ५०० कोटी रुपये अर्थसाह्याची तरतूद करून ठेवली आहे.
या योजनेअंतर्गत इतर राज्यातील जातिवंत दुधाळ म्हशी खरेदी करून दूध संकलन वाढवा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ या वेळी बोलताना केले. या योजनेअंतर्गत प्रत्येक म्हशीसाठी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या ३० हजार अनुदानाचा लाभ घ्या, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान कागल येथे आयोजित करण्यात आलेल्या म्हैस खरेदी करणाऱ्या मळगे खुर्द ता. कागल येथील श्रीराम दूध संस्थेच्या शेतकऱ्यांना अर्थसाह्य मंजुरी पत्रांच्या वितरण कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मळगे खुर्द ता. कागल येथील सुभाषराव चौगुले होते. यावेळी संस्थेच्या १५ सभासद शेतकऱ्यांना ३० म्हशींच्या खरेदीसाठी ३९ लाख रुपये अर्थ सहाय्याची मंजुरीपत्रे देण्यात आली.