SP9/ कोकरूड प्रतापराव शिंदे
विघ्नहर्ता रोडलाईनचे संस्थापक सर्जेराव माईंगडे हे सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या गावात व परिसरात प्रत्येक वर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत हे उपक्रम समाजहिताचे असून कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन विलास बनसोडे यांनी केले
ते तुरुकवाडी ता शाहूवाडी येथील विद्या मंदिर शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सकाळी नऊ वाजता पाटीलवाडी, कोतोली येथे जिल्हा परिषद शाळेतील तसेच न्यू इंग्लिश स्कूल कोतोली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी सैन्य दलातील जवान गणेश काटके व सर्जेराव मांईंगडे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्या मंदीर तुरुकवाडी येथील शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमासाठी तुरुकवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक जयवंत पाटील अशोक पाटील संतोष पाटील संजय मांईंगडे, गणेश काटके, प्रकाश काटके, आप्पासो बनसोडे जगदीश बनसोडे विजय मांईंगडे, सुनील मांईंगडे,अजय मांईंगडे शिक्षिका अंजना पाटील, भाग्यश्री दहीवाल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.