बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या नुतन सभासदांना शेअर्स पावतीचे वितरण आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते..

0
229

शाहुवाडी प्रतिनिधी: अमर पाटील

दुध व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रापंचिक छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करीत मुलांची भावी पिढी चांगली घडविणेसाठी फार मोठी मदत झाली आहे.शाहूवाडी तालुक्यात झालेल्या विकासात दुध संस्थाचे योगदान फार महत्वाचे आहे.तसेच येणाऱ्या काळात दूध संस्थांना अनेक आव्हाने येत आहेत यासाठी सहकारी दूध संस्थांना लागेल ती मदत करणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले…

तसेच शाहूवाडी तालुक्यांमध्ये गटातटाचे राजकारण चालते परंतु येथील प्रत्येक कार्यकर्ता हा सच्चा आणि प्रामाणिक आहे. शाहूवाडी तालुक्यामध्ये सहकार रुजवण्यासाठी दिवंगत नेते माजी आमदार संजयसिंह गायकवाड (दादा) व आनंदराव तात्या पाटील- भेंडसगावकर यांचे मोठे योगदान असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले…

यावेळी माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड,गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील,कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंकर पाटील (बारगीर),संचालक पांडुरंग काशिद,राजाराम चव्हाण,माजी सभापती बाबा लाड,परशुराम खुडे,शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष इनामदार,माजी उपसभापती महादेव पाटील,बाळासाहेब गद्रे,पंडीतराव नलवडे,विष्णू पाटील…

शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत,विजय दादा पाटील-भेंडसगावकर,मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर,आण्णासाहेब गायकवाड,सज्जन पाटील,बाळासाहेब पाटील,अजय लोध,गोकुळ दूध संघाचे एम.डी योगेश गोडबोले,व्यवस्थापक संकलन अधिकारी शरद तुरंबेकर यांच्यासह शाहूवाडी तालुक्यातील विविध दूध संस्थेचे पदाधिकारी,संचालक,सभासद,दूध उत्पादक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here