सरोजनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था कोल्हापूर आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

0
222

प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील

कोल्हापूर : रोजनी मंच, सरोजनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था कोल्हापूर आयोजित दिनांक 30 डिसेंबर शनिवारी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.मुलांना त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या सुनिता हनिमनाळे यांनी केले होते.या चित्रकला स्पर्धेसाठी वयोमर्यादा पाच ते दहा वर्षे अशी होती.

या स्पर्धेचे आयोजन सायंकाळी चार ते सात पर्यंत केले होते.मुला मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या मुला मुलींना बक्षीस वाटप करण्यात आले.

ही स्पर्धा ताराबाई पार्क गार्डन डी मार्ट जवळ आयोजित केली होती.या स्पर्धेसाठी लागणारे ड्रॉइंग पेपर कलर हे आयोजका मार्फत मोफत दिले होते.या सरोजनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या व सामाजिक कार्यकर्त्या सुनिता हनिमनाळे यांनी हा स्तुत्य असा उपक्रम आयोजित केला होता.समाजामध्ये विविध कार्यक्रम उपक्रम त्या राबवत असतात.विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here