बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. आयरा आणि नुपूर हे महाराष्ट्रीय पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहे. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
आयराच्या लग्नानिमित्त मुंबईतील घर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे. त्यांच्या घराचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा नोव्हेंबर २०२२ मध्ये साखरपुडा झाला होता. आता हे जोडपे ३ जानेवरी रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. अगदी पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने आयरा व नुपूरचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
आयराचा होणारा नवरा नुपूर हा महाराष्ट्रीयन आहे. तर लग्नानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दिल्लीत व जयपूरमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. वडील म्हणून आमिरसाठी हा महत्त्वाचा आणि भावनिक क्षण आहे.