डॉ. घाळी कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

0
124

विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय अरविंद अण्णा कित्तुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसी कॅडेट्स द्वारा आयोजित गार्डऑफ ओनर ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव ऍडव्होकेट भोसकी सहसचिव माननीय बंदी ,संचालक माननीय किशोर हंजी , माननीय डॉ.कोल्हापुरे , तसेच माननीय महेश घाळी उपस्थित होते.

विद्या प्रसारक मंडळावर प्रेम करणारे गडहिंग्लज नगरीतील अनेक मान्यवर मंडळी या स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉक्टर घाळी कॉलेजच्या प्रांगणात मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वातंत्र्य दिनानिमित्त जागृती प्रशाला.

आर के जुनियर कॉलेज आणि डॉक्टर घाळी कॉलेजमधील हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे डॉक्टर घाळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मंगल कुमार पाटील यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सरोज बिडकर यांनी केले.

मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत डॉक्टर सरोज बिडकर यांनी पंचप्राण ही शपथ दिली.


कार्यक्रमाचे आभार ओंकार खतखले आणि मांडले. उपस्थित सर्व शिक्षक प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व विद्यार्थी यामुळे कॉलेजचे मैदान अतिशय सुंदर आणि सर्वांमध्ये चैतन्य निर्माण करणार दिसत होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here