कोल्हापूरच्या पोटात दडलय काय …?

0
135

कोल्हापूर हा महाराष्ट्राचा महत्वाचा जिल्हा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी व कर्नाटक बॉर्डरला लागून असल्याने काही भागात कन्नड बोलली जाते.

येथील श्री करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. पंचगंगा येथील प्रमुख नदी आहे.

शहराच्या आसपास पन्हाळागगनबावडाइचलकरंजी नृसिंहवाडीखिद्रापूरविशाळगडराधानगरीदाजीपूर अभयारण्य शाहूवाडी इत्यादी प्रमुख ठिकाणे आहेत. कोल्हापूरला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी म्हणूनही ओळखले जाते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला.

इतिहास कोल्हापूर आपल्या रंगबेरंगी पोशाख आणि कोल्हापुरी चप्पल यांसोबतच आणखीन काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरावर काही काळापूर्वी छत्रपती भोसले घराण्याचे शासन होते.

खाद्यसंस्कृती [संपादन]

कोल्हापूरमध्ये मिळणारे प्रसिद्ध आणि रुचकर खाद्य पदार्थ म्हणजे कोल्हापूरची मिसळ

. महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध मिसळ कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिळते.

उदा. बावडा मिसळ, फडतरे मिसळ, चोरगे मिसळ, हॉटेल साकोली मिसळ, खासबाग मिसळ वगैरे मांसाहारी खाद्य पदार्थांच्या संदर्भात कोल्हापुरातला तांबडा रस्सा (मटणाचे सूप), पांढरा रस्सा (मटणाचे सूप फक्त पांढऱ्या रंगाचे), मटणाचे लोणचे, खिमा राईस बॉल्स प्रसिद्ध आहेत.

कोल्हापुरातल्या खाऊ गल्लीत असलेली राजाभाऊंची भेळ प्रसिद्ध आहे. मिरजकर तिकटी, गंगावेस येथे दूध कट्ट्यावर उत्तम प्रकारचे ताजे दूध मिळते. इथले महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे.

पंचगंगा इथली प्रमुख नदी. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. कोल्हापूरची लवंगी मिरची प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्हा (जुना) शाहू महाराजांचा जिल्हा म्हणूनही सर्वपरिचित आहे.

एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडले होते म्हणून देवांच्या विनंतीवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते.

आश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला. कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावे आहेत ती तशीच पुढेही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते.

कोल्हापूरचा पिवळाधमक गूळ आणि मसाले कुटणारे डंग

हेही कोल्हापूरचे वैशिष्ट्य. सध्या भारतातल्या बहुतेक हॉटेलांत व्हेज कोल्हापुरी, कोल्हापुरी चिकन हे पदार्थ उपलब्ध असतात; पण कोल्हापुरी म्हणजे तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचे. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो. हा रस्सा बाकी रश्श्यांप्रमाणे किंवा ग्रेव्हीप्रमाणे टिकाऊ नाही. तांबडा रस्सा तयार करताना कोल्हापुरी चटणी

वापरावी लागते.

कोल्हापूरचा अजून एक प्रकार म्हणजे दावणगिरी लोणी डोसा. हा डोसा बऱ्याच ठिकाणी मिळतो. भरपूर लोणी आणि जाळीदारपणा ही त्याची खासियत. कोल्हापुरात मांसाहारी, शाकाहारी स्वयंपाकाची घराघरातली पद्धत जवळपास सारखीच असते.

पांढरा तांबडा रस्सा, सुके मटण, खिमा हे प्रकार आख्ख्या कोल्हापुरात होत असतात. त्याचबरोबर तिथल्या पोळ्यांचीही (चपात्या) एक खासियत आहे. तीन पदर सुटलेली व खरपूस तेल लावून भाजलेली ही गरम गरम चपाती अप्रतिम लागते.

इथली आणखी एक खासियत म्हणजे ‘पोकळा’ नावाची पालेभाजी.

तव्यावर केलेली ही भाजी, भाकरी आणि खर्डा यांना तोड नाही. याबरोबरच दूधकट्ट्यावर मिळणारे आणि ग्राहकासमोरच काढण्यात येणारे म्हशीचे धारोष्ण दूध. थेट पेल्यातच धार काढायची व पेला तोंडाला लावायचा! आणखी एक अफलातून प्रकार म्हणजे, ताज्या दुधात सोडा घालून प्यायची पद्धत अशा पद्धतीने दुधाचे निर्जंतुकीकरण होते.

मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे.

अनेक अजरामर चित्रपटांची कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्मिती झाली. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी “जयप्रभा स्टुडिओ”ची निर्मिती केली. तसेच रंकाळा तलावाच्या पिछाडीस शालिनी सिने स्टोन हा स्टुडिओ होता. सध्या फक्त कोल्हापूर चित्रनगरी हेच शूटिंगसाठी ठिकाण उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here