सुर्यासारखा कायम तेजस्वी व आकर्षक दिसेल चेहरा, फक्त सकाळी उठून करा ‘ही’ २ सोपी कामे!

0
138

जर तुम्ही दररोज सकाळी उठल्या उठल्या ही २ सोपी कामे केली तर तुमच्या चेह-यावर कायम उगवत्या सुर्यासारखा ताजेपणा, टवटवीतपणा दिसून येईल. सोबतच आज आम्ही टेस्टी व हेल्दी ड्रिंकची रेसिपीही सांगणार आहोत जे प्यायल्याने स्किन आणखीनच चांगली होईल.

सुंदर दिसणं कोणाला नाही आवडत? अनेक जण असे असतात ज्यांना हा न्यूनगंड असतो की ते कधीच सुंदर दिसू शकत नाहीत. पण हा त्यांचा गैरसमज असतो. कोणीही व्यक्ती सुंदर दिसू शकतो.

सुंदर दिसणे म्हणजे काय तर सुंदर त्वचा असणे, त्वचा निरोगी राखणे. सुंदरतेचे मोजमाप रंगावरून करण्यापेक्षा त्वचा किती निरोगी आहे त्यावरून केले तर अधिक समर्पक ठरेल. तुम्हाला माहीत आहे का तुमच्या दिवसाची सुरुवात जर एनर्जीमय झाली अर्थात जबरदस्त ऊर्जेने झाली तर दिवसभर तुमची त्वचा सुर्याप्रणाने तेजस्वी राहते.

आज आम्ही तुम्हाला या लेखामधून अशा काही टिप्स देणार आहोत ज्या तुमच्या स्किन मध्ये सकाळपासूनच ग्लो भरतील आणि तो टिकवून ठेवण्यासोबत तुम्हाला अधिक सुंदरही करतील. या टिप्समुळे तुमच्या शरीरात ऊर्जेचा वास होईल आणि त्वचा हायड्रेटेड राहील हे विशेष! चला तर जाणून घेऊ काय आहेत या आगळ्यावेगळ्या टिप्स!

हेल्दी ड्रिंकिंग हॅबिट

हेल्दी ड्रिंकिंग हॅबिट

सकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एका हेल्दी आणि रिफ्रेशिंग ड्रिंक सह करावी. ज्याममुळे तुमची बॉडी आणि ब्रेन दोन्ही रिचार्ज राहतील. सोबतच तुमच्या स्किनला फ्रेश ग्लो देऊ शकतील. चला तर जाणून घेऊया की कोणत्या प्रकारचे ड्रिंक तुम्ही तयार करायला पाहिजे. एक ग्लास पाणी घेऊन गरम करा. आता या पाण्यामध्ये 3 चमचे साखर आणि 1/4 चमचे मीठ टाका. जेव्हा पाणी उकळू लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि कॉफी मग मध्ये गाळून घ्या. आता हे पाणी घोट घोटभर चहा सारखे प्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोस्ट वा कुकीज सोबत सुद्धा हे ड्रिंक पिऊ शकता.

(वाचा :- ‘या’ डाळीचे सेवन केल्यामुळे वाढेल चेहऱ्यावरील चमक, काही आठवड्यांमध्येच तुम्हाला जाणवेल फरक)

एलोवेरा जेल आईस क्यूब

एलोवेरा जेल आईस क्यूब

सकळच्या वेळेस चेहरा धुतल्याशिवाय डोळे उघडताच सर्वात आधी आपल्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. असे करणे खूप लाभदायी असते कारण रात्री तुमच्या स्कीन द्वारा निर्माण केले गेलेले नैसर्गिक तेल त्वचेवर येते. यामुळे स्कीन सेल्सचा मसाज केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. यानंतर एलोवेरा जेलने तयार केलेल्या आईस क्यूबने चेहऱ्यावर 4 ते 5 मिनिटे मसाज करा. हे क्युब्स तुम्ही अगदी सहजपणे तयार करू शकता. 2 चमचे एलोवेरा जेल घ्या आणि 2 चमचे गुलाबजल घ्या. दोन्ही गोष्टी मिक्स करून आईस ट्रे मध्ये रात्रीच्या वेळी जमा होण्यासाठी ठेवून द्या. जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या तुम्ही त्यांचा वापर करू शकाल.

(वाचा :- लांबसडक आणि मऊ केस हवे आहेत? वापरा ‘हे’ घरगुती तेल, केसातील कोंडा देखील होईल कमी)

ग्रीन टी आईस क्यूब

ग्रीन टी आईस क्यूब

ग्रीन टी आईस क्यूब सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. सर्वात आधी ग्रीन टी बनवा आणि थंड झाल्यावर आईस ट्रे मध्ये भरून फ्रीजर मध्ये ठेवून द्या. सकाळी एक आईस क्यूब घेऊन तो हलका हलका चेहऱ्यावर चोळा. त्वचेवर आईस क्यूब लावण्याची योग्य पद्धत अशी असते की तुम्ही कोणत्या तरी सुती रुमाला मध्ये लपेटून नंतर त्वचेवर आईस क्यूब लावावे. यामुळे आईस क्यूब पकडण्यात सुद्धा सोपे जाते आणि बर्फ थेट त्वचेच्या संपर्कात येत नाही. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही आईस क्यूब त्वचेवर लावलं तेव्हा हीच पद्धत वापरा कारण हीच योग्य पद्धत मानली जाते.

आईस क्यूब लावायचा नसेल तेव्हा

आईस क्यूब लावायचा नसेल तेव्हा

जर तुम्हाला आईस क्यूब लावण्यात समस्या असेल किंवा ही पद्धत आवडत नसले तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला अजून एक सोप्पा उपाय सांगतो. बदाम तेलाचे 4 ते 5 थेंब घेऊन चेहऱ्यावर आणि मानेवर 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. हा मसाज करण्याआधी आपला चेहरा ताज्या पाण्याने स्वच्छ करायला विसरू नका. जर त्वचा चिपचीपीत वाटत असेल तर तुम्ही फेसवॉशचा वापर करू शकता. यानंतर बदामच्या तेलाने मसाज करा. ज्यांना आईस क्यूब वापरणे आवडत नाही त्यांच्यासाठी हा उपाय बेस्ट आहे.

महत्त्वाची गोष्ट

महत्त्वाची गोष्ट

जर तुम्हाला शुगर म्हणजेच मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही सुरुवातीला वर सांगितलेल्या मोर्निंग ड्रिंकचे सेवन करण्या ऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक टीचे सेवन करू शकता. मात्र विसरू नका की यात साखर किंवा मध मिसळायचे नाही. बाकी तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इतर आहार घेऊ शकता. तर मंडळी अशाप्रकारे कोणीही आपली त्वचा निरोगी राखू अधिक सुंदर दिसू शकतो. फक्त त्यासाठी अशा काही टिप्स न चुकता फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here