देवगड – निपाणी महामार्ग च्या कामामध्ये भ्रष्टाचार मनसेने उघडकीस आणला

0
83

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

देवगड निपाणी महामार्गाचे नुकतंच काम झाले या मार्गामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने कामे होऊन यामध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे, असे मनसेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरी यांना निदर्शनास आणून देऊन कागदपत्रे पुरावे देऊन प्रत्यक्ष फोटो आणि व्हिडिओद्वारे खुलासा करून दिला,

या महामार्गाची पूर्ण पाहणी व अभ्यास मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी केला असून यामध्ये अनेक भ्रष्टाचार उघडकीस येत आहे, आणि या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने न्यायालयात दाद मागू अशी माहिती जिल्हा अध्यक्ष नागेश दादा चौगुले यांनी दिली,

या भ्रष्टाचाराच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना या संदर्भातले निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता इंगवले यांना निवेदन देण्यात आले यावेळी


जिल्हाध्यक्ष नागेश चौगले,जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ,युवराज येडुरे तालुका अध्यक्ष राधानगरी राजेंद्र चव्हाण,तालुका अध्यक्ष कागल सौरभ पवार, विनायक आवळे,प्रवीण मनुगडे, प्रशांत सनदी, जगदीश पाटील, महेंद्र पाटील, संदीप चव्हाण, अमित कोरे, शिवतेज विभुते, राहुल पाटील, अक्षय पाटील,सौरभ कांबळे, सुशांत मोरे,अवधूत कालेकर, अमोल आवळे, शुभम माळी,अनिल पुजारी,विनायक सुळकुडे,ओमकार कुंभार व मनसे सैनिक उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here