कोल्हापूर सर्व श्रमिक संघाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0
67

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त सर्व श्रमिक संघ कोल्हापूर जिल्हा आयोजित श्रमिक कार्यालय ते बिंदू चौक कॅण्डल मार्च आणि ऐतिहासिक बिंदू चौक येथे प्रतिमापूजन करण्यात आले,

तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पर्पण करण्यात आले,यावेळी आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी

,
सावित्री फुलेंचा विजय असो , तसेच महामानव यांच्या घोषणा देण्यात आल्या, यावेळी अंगणवाडी संघटना कोल्हापूर, राजमाता जिजाऊ ब्रिगेड, सी. पी. आर. हॉस्पिटल संघटना,

अपेक्स नर्सिंग कॉलेज, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सिंग युनियन, के. डी. सि. बँक युनियन आणि विध्यार्थी यांनी सहभाग नोंदवला, अनेकांनी आपली मते व भावना व्यक्त केल्या, यावेळी जयंतीसाठी साधारणता 300 जणांची उपस्थिती होती बिंदू चौक येथून कार्यक्रमाची व रॅली ची सांगता करण्यात आली …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here