डी.डी. आसगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम

0
78

सांगरुळ (ता.करवीर) येथील डी.डी.आसगावकर सह. पत संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा तसेच डी.डी. आसगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज (१७ ऑगस्ट) रोजी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात संपन्न झाला.

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोकराव चव्हाण साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद गटनेते मा.आ.सतेज उर्फ बंटी डी.पाटील साहेब होते. यावेळी मी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आमदार पी.एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बाजीराव खाडे, दादासाहेब लाड, एस.डी. लाड, भरत रसाळे, ट्रस्टचे कार्यकारी विश्र्वस्त डी.जी. खाडे, पत संस्थेचे चेअरमन सुभाष कलागते, व्हा. चेअरमन एन. बी. सुतार, विश्र्वस्त व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here