प्रतिनिधी राजेंद्र मकोटे
कोल्हापूर : रोटरी क्लब सभागृहात हृदयस्पर्श च्या नाट्यकर्मी कौतुक सोहळ्यात शरद फीचरच्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील आरोग्य सेवा – सुविधांच्या माहितीच्या ‘ आरोग्य दिनदर्शिका 2020 ‘ चे प्रकाशन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख आणि संकल्प चे डॉक्टर पी एन कदम , ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्या हस्ते संपन्न झाले .
यावेळी उपस्थित हदयस्पर्श कुटुंबप्रमुख पद्माकर कापसे ,ज्येष्ठ लेखक लक्ष्मण द्रविड, डॉ . कविता बमणजोगी , अभिरुची चे प्रसाद जमदग्नी . कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सहभागी दवाखाने तसेच कर्नाटक येथील आरोग्य श्री योजनेत सहभागी दवाखाने विविध रुग्णवाहिका , तसेच विविध सामाजिक संस्था , सर्पमित्र ,आरोग्य सेवक, ब्लड बँक यांच्यासह आपत्त कालीन मदत करणारे कार्यकर्ते , शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे पत्ते – भ्रमणध्वनी यांचा या । आरोग्य दिनदर्शिका – 2024 ‘ मध्ये समावेश आहे .
आरोग्य पत्रकार राजेंद्र मकोटे – निवेदिका सीमा मकोटे यांनी त्याचे संपादन केले आहे . सलग चौदा वर्ष ही स्मरणिका हे आरोग्य दिनदर्शिका प्रकाशित केली जात आहे .