2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त 2 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज महावीर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाने शाहूपुरी पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली. पोलीस स्टेशनचे प्रशासन, पोलीस स्टेशन मधील विविध विभाग, पोलिसांची कर्तव्य, नागरिकांची कर्तव्य याचबरोबर गुन्हा नोंद करण्याची पद्धत, कायदेशीर प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती घेतली.
पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अजयकुमार सिंदकर (PI) यांनी विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची माहिती दिली. ” विद्यार्थ्यांनी वारंवार पोलीस स्टेशनची भेट घेतल्यास त्यांच्यामार्फत पोलीस व समाज यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होऊन समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यामध्ये याची भूमिका महत्त्वाची ठरेल ” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
पोलीस उप निरीक्षक हर्षल बागल, पोलीस उप निरीक्षक विश्वास कुरणे, पोलीस उप निरीक्षक प्रमोद चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल जवाहिरे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या विविध कामकाजाची माहिती दिली. प्राचार्य डॉ आर.पी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन कॅप्टन उमेश वांगदरे, लेफ्टनंट डॉ सुजाता पाटील यांनी केले.