प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील
कोल्हापूर:आदर्श प्रशाला, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे 2 जानेवारी 2024 महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिना निमित्त “शस्त्र प्रदर्शन” करण्यात आले.
शाळेच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच प्रदर्शन बघायला मिळाले. मुलांना टीव्ही व न्यूजपेपर मध्ये रायफल्स व शस्त्रांचे फोटो बघायला मिळतात.
आज त्यांना प्रत्यक्ष अनुभवास मिळाले. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शस्त्रांविषयी माहिती घेतली.शस्त्र पाहिल्यानंतर त्यांचा आनंद द्विगणित झाला. या शस्त्र प्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 16 भारत राखीव बटालियन 3 कोल्हापूर येथील समादेशक मा. श्री. संदिप दिवाण (भापोसे) यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिना निमित्त “शस्त्र प्रदर्शन” पोलीस अधिकारी – पोलीस उपनिरीक्षक शरद डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक अवधेश गुप्ता, प्रशिक्षक सपोहवा उमेश साळुंखे , सपोशि दिवटे, सपोशि जोनवाल, सपोशि बडे, यांनी शस्त्र प्रदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. वाय. पाटील यांनी स्वागत सत्कार केला. पोउपनि शरद डोगरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश, रूपरेषा व पोलीस वर्धापनदिनाची माहिती सांगितली. मुख्याध्यापक श्री. पाटील, यांनी भाषण करून आपल्या शाळेत उपक्रम राबविण्या बद्दल राज्य राखीव पोलीस पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.
मुलांना शस्त्राबद्दल माहिती देवून पोलीस दल संरचना बाबत पोउपनि शरद डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात आदर्श प्रशाला मधील इयत्ता 8 ,9 व 10 वी वर्गातील 210 विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक शरद पांडुरंग डोंगरे, पोलीस कल्याण अधिकारी, भा.रा.ब 3 कोल्हापूर यांनी नियोजन पाहिले.