भाजपमध्ये येतात याचा शोध कोणी लावला हे मला माहित नाही अशी प्रतिक्रिया – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
153

कोल्हापूर : आमदार सतेज पाटलांचा कोणता व्यवसाय आहे मला माहिती नाही पण त्यांचा दोन नंबरचा व्यवसाय म्हणून ते भाजपमध्ये येतात याचा शोध कोणी लावला हे मला माहित नाही अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिली.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अधिकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांचा दोन नंबरचा व्यवसाय असल्याने ते भाजपमध्ये जातील असा आरोप केला होता.

अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अबकी बार ४०० ही घोषणा पुर्णत्वास जाईल.

एकीकडे नागरिकांचा पंतप्रधानांवर विश्वास आहे, मात्र दुसऱ्या बाजूला काहीच नाही, केवळ अधोगती आहे. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे पानिपत झाले आहे. लोकांचा काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही म्हणून लोक आता पर्याय शोधत आहेत. त्यामुळे बहुतांशी मंडळी भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत.

राजाराम कारखान्याच्या एमडींना झालेल्या मारहाणीबद्दल ते म्हणाले. सहकार क्षेत्रातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला मारहाण करणे योग्य नाही. कोणी कायदा हातात घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला त्यांच्याबद्दल काही तक्रारी असतील तर जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, साखर आयुक्त यांच्याकडे दाद मागायला हवी होती. कायदा हातात घेणे योग्य नाही.

न्याय यात्रेमुळे उरलेले राज्यही जातील

ते म्हणाले, राहुल गांधींची यात्रा काही नवीन नाही. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या यात्रेनंतर तीन राज्यात त्यांचा दारुण पराभव झाला. आत्ताच्या यात्रेमुळे थोडेफार जी राज्य शिल्लक आहेत ती सुद्धा जातील. शिल्लक नेतेही पक्षात राहणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here