प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : कोल्हापुरातील पन्हाळा गडाला लागूनच असणाऱ्या पावनगडावरील अनाधिकृत मदरसा पोलिस प्रशासनाने हटवला आहे. यासाठी पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदूत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री दोन वाजता सुरू करण्यात आली. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल सात तासानंतर सकाळी आज ६ जानेवारी नऊ वाजता संपली. जिल्हा पोलीस प्रमुखासह महत्त्वाचे अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून होते. कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.